17.6 C
New York

Kolkata Doctor Case : कोलकाता रेप-हत्या प्रकरण;संदीप घोषसह पाच जणांची पॉलिग्राफ चाचणी

Published:

कोलकाता

कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची अत्याचार (Kolkata Doctor Case) केल्यानंतर हत्या झाल्याने देश सुन्न आहे. या प्रकरणात सीबीआयने (CBI) या प्रकरणातील आरोपी संदीप घोष (Sandip Ghosh) सह सात लोकांची ‘लाय-डिटेक्टर टेस्ट’ म्हणजेच पॉलिग्राफ (Polygraph Test) चाचणी केली आहे. मुख्य आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ टेस्ट जेलमध्ये करण्यात आली. तर माजी प्रिन्सिपल संदीप घोष आणि घटनेच्या दिवशी ड्यूटीवर हजर असलेले चार डॉक्टर आणि एका सिव्हील वॉलंटियर सह इतर सहा लोकांची सीबीआयच्या मुख्यालयात पॉलीग्राफ सत्य शोधन चाचणी घेण्यात आली.

बलात्कार आणि हत्या प्रकरणी आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष, घटनेदिवशी रात्री सेवेत असलेले चार डॉक्टर आणि अन्य एक जण यांच्यावर सीबीआयच्या कोलकाता येथील कार्यालयात चाचणी सुरू आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीतील सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीतील पॉलिग्राफ तज्ज्ञांचे पथक यासाठी कोलकात्यात दाखल झाले आहे. ही चाचणी दीर्घ काळ चालते, तसेच यासाठी केवळ दोन उपकरणे उपलब्ध आहेत, त्यामुळे सर्व सात जणांवर या चाचण्या पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोलकात्यातील या सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये गंभीर जखमा असलेला या महिला डॉक्टरचा मृतदेह नऊ ऑगस्ट रोजी आढळला होता. दुसऱ्या दिवशी मुख्य आरोपी रॉय याला अटक करण्यात आली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास १३ ऑगस्ट रोजी सीबीआयकडे सोपवला होता, त्यानंतर सीबीआयने १४ ऑगस्ट रोजी तपास सुरू केला होता.

वैद्यकीय महाविद्यालयातील फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजीचे प्रात्यक्षिक डॉ. देबाशिष सोम यांच्या घरीही सीबीआयचे पथक पोहोचले आहे. महाविद्यालयाचे माजी अधीक्षक अख्तर अली यांनी तीन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करून भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा आरोप केला होता. त्यांनीच डॉ.देबाशिष सोम यांचे नाव घेतले.

सीबीआयने शनिवारी २४ ऑगस्ट संदीप घोष यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. घोष यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात वैद्यकीय महाविद्यालयात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. बंगाल सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने एसआयटीऐवजी सीबीआयला तपास करण्यास सांगितले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img