20.4 C
New York

Shikhar Dhawan : शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर, गब्बरचा क्रिकेटला अलविदा

Published:

Shikhar Dhawan:भारताचा स्टार शिखर धवन याने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. त्याने आता क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा केलीय. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने घोषणा केलीय. आपल्या एका व्हिडिओतून त्याने यातून निवृत्त होत असल्याच सांगितलंय. त्यानं १ मिनिट १७ सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केलेत. मला क्रिकेट शिकवणारे माझे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अश्या सर्वांचे त्याने आभार मानत क्रिकेटमधून रजा घेत असल्याचं सांगितलय.

शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये असं देखील म्हण्टलंय की, मी माझ्या क्रिकेट चा प्रवास आता इथेच संपवत आहे. या सोबतच मी असंख्य आठवणी देखील घेऊन जात आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि समर्थनाबद्दल आभार ! जय हिंद. मात्र शिखरच्या या पोस्टवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

पुण्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचं आंदोलन

शिखर धवनची क्रिकेट कारकीर्द

शिखरने २०१० मध्ये ३८ व्या वर्षी भारताकडून पदार्पण केलं होत. त्याने या १३ वर्षाच्या कारकिर्दीत ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय 6793 धावा केल्या आहेत. शिखरच्या नावावर एकदिवसीयमध्ये ६७९३ धावा केल्यात. शिखरच्या नावावरती १७ शतके आणि ३९ अर्धशतके आहेत. आजच 24 ऑगस्ट 2024 रोजी शिखर याने क्रिकेटला अलविदा केलं आहे. त्याने इंडियन प्रिमियर लिगमध्येही उत्स्फ़ुर्त कामगिरी केलीय. तो पंजाब किंग्स मध्ये कर्णधार देखील राहिला आहे. एकूण आयपीएलमध्ये त्याने ५१ अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावलेली आहेत. त्याने शेवटचा सामना भारताकडून श्रीलंकेविरोधात 29 जुलै 2021 मध्ये खेळला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img