17.6 C
New York

Pune : पुण्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचं आंदोलन

Published:

महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. (Pune) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ सुरु आहे. तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. त्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ‘निषेध आंदोलन’ केलं जात आहे.

बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्षांच्यावतीने आज काढण्यात येणारा बंद रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह महाविकास आघाडीच्या अन्य नेत्याच्या उपस्थितीत आज मूक आंदोलन केले जात आहे.आज सकाळी 10 ते 11 या वेळेत शरद पवार यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन केले जात आहे.

काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत ‘आप’ ?

Pune पुण्यात महाविकास आघाडीचं ‘मूक आंदोलन’

पुण्यात आज महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन केलं जात आहे. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं जात आहे. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं आवडतं ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन लावण्यात आलं आहे. शांततेच्या मार्गाने महाविकास आघाडी महिला अत्याचाराच्या विरोधात निषेध नोंदवत आहे.

सकाळी 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत एक तास हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. काळ्या फिती बांधत हे आंदोलन केलं जात आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे.

Pune महिला अत्याचाराविरोधात महाविकास आघाडी मैदानात

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडी आंदोलन करत आहे. पुण्यात शरद पवारांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. आहे. तर ठाण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img