15.6 C
New York

Bigg Boss Marathi : जान्हवीला आज घराबाहेर जावं लागणार ? बिग बॉसच्या इतिहासातील सगळ्यात घाण स्पर्धक

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या (Bigg Boss Marathi ) सीझनमधील सर्वच सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. (Bigg Boss Marathi New Season) या आठवड्यात जान्हवीला (Jahnavi Killekar) चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने (Ritesh Deshmukh) देखील जान्हवीला तिची जागा दाखवली आहे. रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला म्हणाला, तुला माझ्या भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही.

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती,”आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय”. रितेश भाऊ त्यावर जान्हवीला सुनावत म्हणाला,”‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील जान्हवी तुम्ही एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात…तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे”.

ऑफिसचं काम घरी आणायचंच नाही, बॉसचा फोन आला तर… घाबरू नका

”तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. रितेश भाऊ पुढे म्हणाला, लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते. लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो.

Bigg Boss Marathi बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना धक्का

या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Promo) नॉमिनेशनची (Nomination) चूल पेटली आणि हाऊसफूल एन्टरटेनमेंट झालं. (Bhaucha Dhakka Bigg Boss Marathi) आता आठवड्याभरातील या सर्व गोष्टींवर चर्चा करुन रितेश भाऊ सदस्यांना जोरदार भाऊचा धक्का द्यायला आता सज्ज आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सत्याचा पंचनामा झाला, नॉमिनेशची चूल पेटली. अशा अनेक गोष्टींदरम्यान घरातील सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. काहींकडून गंभीर चूका झाल्या असून सदस्यांना रितेश भाऊ आता या चूका दाखवून देणार असल्याचे पाह्यला मिळणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img