11 C
New York

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद विरोधात गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका

Published:

मुंबई

बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराची (Badlapur School Case) घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) देखील सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून उद्या म्हणजेच शनिवारी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. या बंदला राज्यातील सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. अशातच महाराष्ट्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखली केली आहे.

महाराष्ट्र बंद करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर महाविकास आघाडी हा बंद पुकारत असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून कुणालाही महाराष्ट्र बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा दावाही या याचिकेतून करण्यात आलाय.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत इतरांनी देखील महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र बंद करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी कोर्टात तशी बाजूही मांडली आहे. दरम्यान, याबाबत कायदा स्पष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत मग आमच्या हस्तक्षेपाची गरज काय? तुमची भूमिका स्पष्ट आहे तर यात कोर्टाला का खेचताय? असा सवालही हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img