24.6 C
New York

Maharashtra Bandh : या बंदमुळे सर्वसामान्य जनता भरडली जाते; मुख्यमंत्री काय म्हणाले ?

Published:

मुंबई

महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) शनिवारी जाहीर केलेल्या बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा निर्णय देताना राज्यातील महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. त्यासोबतच शनिवारचा महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) हा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत कोणत्याही राजकीय पक्षाला अशाप्रकारे बंद करण्याची परवानगी नाही, असा महत्त्वाचा निकाल दिला. येत्या काळात जर कोणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया देताना विरोधकांना खडे बोल सुनावले.

कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे पालन आणि अंमलबजावणी राज्य सरकार करणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच महाविकास आघाडीकडून करण्यात येणारा उद्याचा बंद बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे, तरी देखील विरोधकांकडून हा बंद केला जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच या बंदमुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांकडून महाराष्ट्र बंद करण्याचा प्रकार सुरु आहे. येत्या काळात हे राजकारण बंद करा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. या बंदला बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. कोर्टाने म्हटलय अशा बंदला परवानगी देता येणार नाही. ही कोर्टाने हाणलेली चपराक आहे. मागे सुद्धा कोर्टाने दंड लावलेला, त्यातून सुधरा, यावर पहिली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, बदलापूरमधील घडलेल्या घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचा परिणाम राज्यभरात उमटणार असल्याचे चित्र दिसत आहे. या बंदमुळे राज्यातील एसटी महामंडळ आणि रेल्वे सेवेवर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच मुंबईत लोकल सेवेवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते. तर बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री दोन तास बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचे दिसून आले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकाचे काही तरी सुरु आहे? राज्यात काहीतरी भंयकर घडवण्याचा प्रयत्न आहे. कोणी म्हणतं बांग्लादेश होईल. पुरोगामी महाराष्ट्रात आहे हा मतांसाठी, सत्तेसाठी एवढ्या खालच्या पताळीवर जाऊन प्रचार करता. तुम्ही संवेदनशील असाल, तर या दुर्देवी घटनेच राजकारण बंद करायला पाहिजे,असेही प्रसार माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img