11 C
New York

Hiraman Khoskar : काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण

Published:

नाशिक

उद्या नाशिकमध्ये काँग्रेस (Congress) पक्षाची आढावा बैठक आणि पदाधिकारी मेळावा होणार आहे. नाशिक (Nashik) आणि नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढवा घेतला जाणार आहे. त्या आधी आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झालीय.

इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोराकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबईहून आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी, अंगदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांचे चिरंजीव वामन खोसकर ह्यांच्यावर सध्या डेंग्यूचे उपचार सुरु आहेत. म्हणून आपल्याला डेंग्यू असल्याचा संशय आल्याने आमदार खासकर यांनी वैद्यकीय उपचार घेतले. यासाठी हॉस्पिटलने केलेल्या कोरोना तपासणीनुसार त्यांना कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे.

नाशिक येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी तब्येतीची काळजी घेऊन आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. संशय आल्यावर लवकरात लवकर उपचार करून घ्यावे असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे. दरम्यान उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नाशकात दौरा आहे. आमदार खोसकर यांच्याबर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याने ते याबळी उपस्थित नसणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img