17.6 C
New York

Bigg Boss Marathi : ‘फुल ऑन राडा…’, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार नॉमिनेशन टास्क

Published:

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन (Bigg Boss Marathi) सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले असले तरी सदस्यांमध्ये तेवढीच उर्जा आहे. प्रत्येक टास्कमध्ये सदस्य मेहनत घेताना दिसून येत आहेत. (BB Marathi) नव्या सीझनमधील एका पेक्षा एक भन्नाट टास्क ‘बिग बॉस प्रेमींचं’ लक्ष वेधून घेत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज नॉमिनेशन (Nomination) टास्क पार पडणार आहे.

आजचा नॉमिनेशन कार्याचा ‘बिग बॉस मराठी’चा प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोमध्ये, सदस्य आपल्या गळ्यातील फोटो चुलीत टाकून योग्य कारण देत नॉमिनेट करताना पाहायला मिळत आहेत. आर्याचा फोटो जान्हवीने गळ्यात टाकला असून ती म्हणतेय,”माझ्यावर वेळ हिचा फोटो गळ्यात टाकून फिरण्याची आली आहे”. दरम्यान पॅडी अरबाजला म्हणतोय, “सगळे नियम कॅप्टन झाल्यानंतरच लक्षात येतात”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील (Purushottam Patil), योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि निखिल दामले (Nikhil Damle) हे सदस्य बाहेर पडले आहेत. सर्वांचं लक्ष या आठवड्यात कोण बाहेर पडणार याकडे लागलं आहे. नॉमिनेशन कार्य यासाठीच घरात पार पडणार आहे.

शिवरायांच्या काळातील चौरंग शिक्षा काय होती?

Bigg Boss Marathi निक्कीने सूरजला बांधली राखी

घरातील सदस्य एकमेकांना राखी बांधताना दिसत आहेत. छोटा पुढारीने निक्कीला आपल्या बहिणीचा दर्जा दिला होता. आता आजच्या भागात निक्की सूरजला राखी बांधताना दिसणार आहे. निक्की (Nikki Tamboli ) आधी सूरजला (Suraj Chavan) जान्हवी आणि ‘अबीर गुलाल’ मालिकेतील श्रीने राखी बांधली होती. निक्की सूरजला राखी बांधताना दिसणार आहे. (Bigg Boss Marathi New Promo) सूरजला राखी बांधत निक्की म्हणते,”बिग बॉस मराठी’च्या घरात जेवढे दिवस आपण एकत्र आहोत त्याच्यासह बाहेरच्या जगातदेखील मी तुझं रक्षण करेल”. त्यावर सूरज म्हणतो,”मी तुझी बाहेरच्या जगात रक्षा करेल”. निक्की पुढे म्हणते,”मी जिवंत असेपर्यंत तुला काही कमी जाणवणार नाही. तुला कधीही माझी आठवण आली तर फक्त एक कॉल कर. तुझ्यासाठी मी कायम हजर असेल..नेहमी आनंदी राहा”. त्यानंतर अंकिता डीपी दादाला राखी बांधते. तर दुसरीकडे इरिनाला आपल्या भावाची आठवण येते आणि तिचे डोळे पाणावतात. अरबाजकडे इरिना आपल्या मनातील भावना व्यक्त करते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img