20.4 C
New York

Badlapur Case : …मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचा, क्षमता नसलेला माणूस; उद्धव ठाकरे कडाडले

Published:

मुंबई

बदलापूर प्रकरणानंतर (Badlapur Case) आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणाचे विरोधक राजकारण कर आहेत. शिवाय तिथे झालेले आंदोलन हे राजकीय दृष्टीने प्रेरीत होते. हे विकृत मानसिकतेचे लक्ष आहे अशी टिका विरोधकांवर केली आहे. याचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. बदलापुरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत आहेत असा हल्लाबोलच ठाकरे यांनी केला. एखाद्या घटनेचा निषेध करणाऱ्यांना तुम्ही विकृत म्हणत असाल तर निषेधही करायचा नाही का? असा सवालही ठाकरे यांनी केला. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनाही शाब्दीक फटकारे लगावले.

बदलापूर एकीकडे पेटलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करत होते. त्यांनी त्यावेळी बदलापुरला जाणे गरजेचे होते. पण मुख्यमंत्री रत्नागिरीत मिरवत होते. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत होता. अशा वेळी मुख्यमंत्र्यांना काही वटत नव्हतं. वर ते जे निषेध करत आहेत त्यांना विकृत म्हणत होते. जनतेच्या मनातला तो उद्रेक होता हे मुख्यमंत्र्यांना समजलं नाही. उलट विरोधकांनाच दोषी ठरवायचं हे निर्लज्ज पण आहे असही ठाकरे म्हणाले. ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना रत्नागिरीत अकेलची दिवाळखोरीच दाखवली असा टोलाही या निमित्ताने ठाकरे यांनी लगावला.

गुन्हा झाल्यानंतर पिडीताच्या आईला ताटकळत पोलीस स्थानकात उभं करण्यात आलं होतं. ती गर्भवती होती. पोलीसांनी तक्रार घेण्यास उशीर केला. पोलीसांवर कोणाचा दबाव होता हे समजले पाहीजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा आरएसएस, भाजपच्या संबधित शाळा आहे. त्यातून कोणी दबाव टाकला का असा प्रश्न ठाकरे यांनी केला आहे. हे सरकार नराधमाचं सरकार आहे का? झालेली घटना मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का? असा खडा सवाल ही त्यांनी केला आहे. ठाकरेंना यावेळी शिंदेंना थेट लक्ष्य केले आहे. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निष्क्रीय आहेत. ते कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेत नाहीत असा थेट आरोप या निमित्ताने ठाकरे यांनी केला. अभिषेक घोसळकरांची हत्या झाली त्यावेळी ही त्यांचे वर्तन तसेच होते असेही ठाकरे म्हणाले. गृहमंत्री जबाबदारी घेत नाही. क्षमता नसलेला व्यक्ती मुख्यमंत्री आहे. फक्त ढोल पिटणे हेच त्यांना काम आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्त कोण आहेत. त्यांनी या प्रकरणी बोललं पाहीजे. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.

24 तारखेला बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद राजकीय स्वरूपाचा नाही असे ठाकरे म्हणाले. सर्वांनी या बंदमध्ये स्वत: हून सहभागी व्हावे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. महाराष्ट्र जागृत आहे हे दाखवण्यासाठी हा बंद असल्याचे ते म्हणाले. सुरक्षित बहीण हिच आमची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जातपात धर्म पक्ष बाजूला ठेवून या बंदमध्ये सहभागी व्हा असे ठाकरे म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी निट वागावे. सत्ता गेल्यानंतर याच ठाण्यात तुम्हाला राहायचे आहे असेही ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img