19.2 C
New York

Saif Ali Khan : तर ‘त्या दिवशी त्याने माझा जीवच घेतला असता’.

Published:

Saif Ali Khan :बॉलिवूड मधील एका ब्रेकनंतर सैफ अली खानने पुन्हा एकदा बॉलिवूड मध्ये पुनराआगमन केलय. ‘दिल चाहता है’ नंतर सैफ अली खान ने बॉलिवूड मध्ये आपली विशेष छाप सोडली. काही वृत्तांनुसार (Saif Ali Khan)सैफ अली खान ‘रेस ४ च्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. मात्र,दिल्ली मध्ये घडलेली घटना सैफ च्या जीवावर बेतली असती, त्याने स्वतः ही घटना सांगितली.

दिल्लीच्या नाईटक्लब मध्ये हा प्रसंग घडला…

सैफ ने सांगितलं की, मी दिल्लीतलया एका नाईटक्लब मध्ये बसलो होतो तेव्हा, एक मुलगा माझ्याजवळ आला आणि त्याने मला विचारले की, तुम्ही माझ्या मैत्रिणिसोबात डान्स कराल का? यावर मी त्याला नकार दिला आणि म्हणालो की, मी हे सर्व करत नाही. त्यावर तो मुलगा म्हणाला, तुला खूप सुंदर आणि आकर्षक चेहरा मिळाला आहे. हे ऐकून मला आनंद झाला. मला वाटलं कि तो खरंच माझी स्तुती करत आहे, म्हणून मी हसायला लागलो.

बदलापूर अत्याचार प्रकरणावर सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत

त्याने माझावर केला दोनदा हल्ला….

सैफ अली खानने या पुढे सांगितलं की, त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं.एवढच नाही तर त्याने माझ्या डोक्यावरती व्हिस्की ची बॉटल देखील फोडली. माझ्या डोक्यातून रक्त वाहू लागल्यामुळे मी लगेच वॉशरूम ला गेलो. आणि तो सलग माझ्या पाठोपाठ आला. रक्त येत असल्यामुळे मी माझ्या डोक्यावरती पाणी ओतलं, आणि पाणी ओतताना त्या व्यक्तीला मी बोललो, बघ हे काय केलस तू त्यावर त्या व्यक्तीला राग आला. आणि त्याने पुन्हा माझ्यावरती सोप डिश ने हल्ला केला. तो मला वेडा वाटत होता. त्याने मला ठार मारलं असत, असे सैफ अली खानने सांगितले.

‘रेस’मध्ये सैफ अली खानच कमबॅक

सैफ अली खानसोबत रेस फ्रेंचाइजची सुरुवात झाली होती. दोन्ही भागात त्याने रणवीर सिह ही व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून सैफ अली खानला वगळण्यात आले होते. त्यामुळे सैफ आता रेस -४ मध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपटाचा बेसिक प्लॉट तयार झाला असून, लवकरच चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img