24.6 C
New York

Badlapur School Case : ‘त्या’ घटनेवर बदलापूरमध्ये पालकांचा उद्रेक; आरोपीला फाशी देण्याची मागणी

Published:

बदलापूर

बदलापूरमधील (Badlapur) एक नामांकित शाळा, आदर्श विद्या मंदिर, येथे साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या (Badlapur School Case) धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या भयानक प्रकाराने संपूर्ण बदलापूर हादरले असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावग्रस्त झाले असून, नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज शाळेच्या बाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त नागरिकांनी ‘बदलापूर बंद’ आंदोलन केले. त्यांनी आदर्श विद्या मंदिर शाळा कायमची बंद करण्याची मागणी केली आहे.

शाळेसमोरील आंदोलनानंतर नागरिकांनी बदलापूर शहरातील प्रमुख मार्गांवर रस्ता रोको आंदोलन केले, तसेच बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करत रेल्वे सेवा ठप्प केली. आंदोलनकर्त्यांनी शाळेतील प्रशासनावरही तीव्र नाराजी व्यक्त करत, शाळेच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संपूर्ण बदलापूर शहरात या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. या आंदोलनामुळे शाळा प्रशासन आणि पोलिसांवर दबाव वाढला असून, न्याय मिळवण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूच आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img