20.4 C
New York

Badlapur School Case : बदलापूर आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांकडून लाठीचार्ज तर, आंदोलकांकडून दगडफेक

Published:

बदलापुर

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील लैंगिक (Badlapur School Case) अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापुरात आंदोलन सुरू आहे. संतप्त झालेल्या आंदोलकांना रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरू केले. यामुळे येथील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आरोपीला फाशी द्या अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. मागील चार तासांपासून आंदोलन सुरू होते. बदलापुरात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बदलापुरात तीन तासांपासून रेल रोको आंदोलन सुरु आहे. बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. त्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे.

बदलापूर शाळा दोन अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरण. संबंधित बदलापूर पूर्व पोलीस अधिकाऱ्यांची बदली. गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी केल्याचा आरोप करत बदली केल्याची माहिती. संस्था चालकांवरती कारवाई करण्यासाठी शिक्षण संस्थेने नेमली चौकशी समिती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img