20.4 C
New York

Albatya Galbatya : बालनाट्य अलबत्या गलबत्याचा विश्वविक्रम

Published:

महाराष्ट्र प्रदेशाला दीर्घ नाट्य परंपरा लाभली आहे.‌‍‌ (Albatya Galbatya) याच मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे एक महत्त्वाचे अंग म्हणजे बालनाट्य. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली तरी ती केवळ बालकांनी सादर केलेली नसतात नाटकातील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रीतीने हे बालनाट्य रंगमंचावर दाखवली जातात. या नाटकात केवळ बालकांनाच प्राधान्य असेल असे नाही. नाटकांमध्ये लहान मोठ्या वयाची माणसे,प्राणी, पक्षी राक्षस, भुते यातील काहीही असू शकते. लोककथा, परिकथा, साहस कथा किंवा बालकांच्या समस्या असे या नाटकांचे विषय असतात.

अशी नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी निर्मात्याला प्रत्यक्ष मुलांच्या डोळ्यांनी व मनाने नाटकाकडे बघावे लागते. ठाशीव कथासूत्र, सोपे चटकदार आणि चटपटीत संवाद हे या नाटकांचे वैशिष्ट्य असते. मुलांचे भाषा ज्ञान प्रौढा इतके प्रगल्भ नसल्याने नाटकात संवादापेक्षा प्रकाश योजना, कथेला अनुसरून वातावरण निर्मिती, पात्रांची वेशभूषा आणि रंग म्हणजे व्यवस्थापन यांकडे अधिक लक्ष दिलेले असते. मुलांना जास्त ताण सहन होण्यासारखा नसल्याने नाटकातले वातावरण हलकेफुलके असते. याच मराठी बालरंगभूमीवरील ‘अद्वैत थिएटर’ निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याने 78 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2024 रोजी एकाच दिवशी सलग सहा प्रयोग एकाच टीम द्वारे श्री छत्रपती शिवाजी मंदिर दादर येथे निर्माता राहुल भंडारे यांच्या नेतृत्वाखाली सादर करून एक विश्वविक्रम रचला आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट

या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया च्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांनी अद्वैत थिएटरला प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले. वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया द्वारे विविध कला गुण असलेल्या, काहीतरी जगावेगळ करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना नेहमीच सहकार्य करून व्यासपीठ देण्याचे अविरत कार्य आत्तापर्यंत करत आलेली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img