पुणेकर आपल्या बुद्धीचातुर्य, चिकटी आणि निष्ठेमुळे ओळखले जातात. (Pune Burger King) आपल्या या गुणांच्या जोरावर जगभरात पुणेकरांनी आपल्या यशाची पताका रोवली आहे. व्यवसायात पुणेकरांची प्रगती चौफेर झाली आहे. दिग्गज अमेरिकन कंपनी बर्गर किंगला पुण्यातील एका व्यावसायिकाने धडा शिकवला. जगभरात 100 देशांमध्ये 13 हजार रेस्टॉरेंट असणाऱ्या बर्गर किंगविरुद्धची कायदेशीर लढाई पुणेकराने जिंकली आहे. पुणे शहरात बर्गर किंग नावाच्या लोकप्रिय रेस्टॉरंटने बर्गल किंगविरुद्धची कायदेशीर लढाई जिंकली आहे.
Pune Burger King न्यायायलयाचा निकाल असा
पुण्यातील कॅम्प परिसरात बर्गर किंग रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटविरुद्ध अमेरिकन फास्ट फूड कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनने दाखल केलेली याचिका पुणे जिल्हा न्यायालयाने फेटाळली. न्यायाधीश सुनील वेद पाठक यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, अमेरिकन कंपनीने पुणे येथील कंपनीवर ट्रेडमार्क उल्लंघनासह अनेक आरोप केले होते. पुण्यातील कंपनीला त्यांचे नाव वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी कंपनीने न्यायालयाकडे केली होती. शिवाय त्यांना नुकसानभरपाईही देण्यात यावी. पुण्याचे बर्गर किंग रेस्टॉरंट अनाहिता आणि शापूर इराणी चालवतात. कॅम्प आणि कोरेगाव भागात त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. त्यांचे नाव 1992-93 पासून आहे. अमेरिकन कंपनी खूप नंतर भारतात आली. पुण्याची कंपनी दुसरीकडेहे नाव बराच काळ वापरत होती. यामुळे अमेरिकन कंपनीची मागणी फेटाळली जात आहे.
राजकारणात एकनाथ शिंदे कर्ण; तर, फडणवीस आणि पवार..सदाभाऊंनी दिली ‘ही’ उपमा
Pune Burger King बर्गर किंगची 13 हजार रेस्टॉरंट
बर्गर किंगची स्थापना 1954 मध्ये झाली. त्याची सुरुवात जेम्स मॅकलॅमोर आणि डेव्हिड एडगरटन यांनी केली होती. ही कंपनी 100 हून अधिक देशांमध्ये 13 हजार रेस्टॉरंट चालवत आहे. या रेस्टॉरंटपैकी 97 टक्के या कंपनीची मालकी आहे. ही जगातील दुसरी सर्वात मोठी फास्ट फूड हॅम्बर्गर कंपनी मानली जाते. यामध्ये सुमारे 30,300 लोक काम करतात. 1982 मध्ये कंपनीने प्रथमच आशियामध्ये प्रवेश केला. पण २०१४ मध्ये ही कंपनी भारतात आली.
न्यायालयात गेल्या 13 वर्षापासून याबाबत केस चालू होती. अखेर पुण्यातील रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल लागलेला आहे. अमेरिकेच्या फूड कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनची याची ठरलेली आहे. याबाबत जिल्हा न्यायाधीश सुनिद वेद पाटील यांनी 16 ऑगस्ट रोजी आदेश देखील सांगितलेले आहे. पुण्यातील कंपनीवर अमेरिकन कंपनीने ट्रेडमार्क उल्लंघनाच्या आरोप केलेला होता. त्याचप्रमाणे पुण्यातील कंपनीला त्यांचे नाव वापरण्यास देखील बंदी घातली होती. तसेच त्यांच्यावर नुकसान भरपाई देखील द्यावी, असे देखील सांगितलेले होते. हे रेस्टॉरंट पुण्यातील कॅम्प आणि कोरेगाव भागात आहेत. आणि लोकांना देखील हे रेस्टॉरंट खूप आवडतात. न्यायाधीशांनी या केसमध्ये सांगितलेले की, पुण्याचा बर्गर किंग (Pune Burger King) हे नाव 1992 ते 93 पासून वापरत आहे.