24.6 C
New York

Bigg Boss Marathi : रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट

Published:

‘बिग बॉस मराठी’ हा भावनांचा खेळ आहे. (Bigg Boss Marathi ) आता चौथा आठवडा सुरू झाला असून सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. (Bigg Boss Marathi New Season) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांनी तिन आठवड्यातच नाती निर्माण केली आहेत. (Bigg Boss Marathi New Promo) छोटा पुढारी (Ghanshyam Darode) आणि निक्कीमध्ये (Nikki Tamboli) बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. या भावा बहिणीच्या नात्यात पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की आणि छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला आहे.

प्रोमोमध्ये निक्की घन:श्यामला म्हणतेय,”तू फेक आहेस”. त्यावर घन:श्याम तिला विचारतो, “काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय… तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी.. यावर निक्की म्हणते,”नको देऊ. त्यावर घन:श्याम म्हणतो,”निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना”. नेटकऱ्यांच्या निशाण्यावर निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी आहेत. आम्ही दोघे बहीण -भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्की सोबत मैत्री केली. पण प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली दोघांच्या पप्पी आणि झप्पीमुळे उडवली. आता ऐन रक्षाबंधनच्या दिवशीच त्यांच्यात मोठा वाद झालेला पाहायला मिळेल.

Bigg Boss Marathi योगिता चव्हाण आणि निखिल दामले ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर!

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या जोरदार राडा सुरू आहे. या आठवड्यात डबल एविक्शन पार पडलं आहे. निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोन सदस्यांचात्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला प्रवास संपला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात निखिल दामले, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img