धारावीचा पुनर्विकास व्हावा, अदानींचा नाही तसच धारावी येथील नागरिकांना धारावीतच घरे मिळावीत. पण सध्याची परिस्तिथी पाहता शिंदे सरकार (Eknath Shinde) अदानींच्या खिशात आणि मुंबई अदानींच्या घशात अशी परिस्तिथी असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी धारावी येथे केली.
धारावी बचाव आंदोलन करत असताना आता पूर्ण मुंबईसाठी मुंबई रक्षक आंदोलन करण्याची गरज ठाकरे गटाने व्यक्त केली. इंग्रज देशात व्यापार करण्यासाठी आले आणि ते राज्यकर्ते बनले. त्यामुळे मुंबईतील जमिनी ह्या अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे.तसच शिंदे सरकार हे अदानींचे नोकर आहेत. पाचशे चौरस फुटांचे घर सर्व धारावीकरांना पात्र ठरवून दिले जातील, असं ठाकरे यांनी नमूद केलय.
बालनाट्य अलबत्या गलबत्याचा विश्वविक्रम
सर्व जाती,धर्म आणि प्रांतांमध्ये भांडणे लावून भाजप सरकारला सत्ता मिळवायची आहे. अयोध्येतील सर्व जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या गेल्या. हिंदू मंदिरांच्या जमिनी हे सरकार विकासकांच्या घशात घालत आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनी तसेच हिंदू मंदिरे विकून दिल्या जाणार नाहीत, तसेच शिवसेना ठाकरे गट धारावीकरांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी उभा आहे. तसच धारावीवर बुलडोझर फिरवला जाण्याची शक्यता आहे. पण हा बुलडोझर त्यांच्यावरती फिरवला जाण्याची शक्यता आहे. पण त्यांच्यावरतीच हा बुलडोझर उलटवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केलय. नागरिकांना १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन देणारे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १५०० रुपये देत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर यामध्ये चांगलीच वाढ करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलंय.