17.6 C
New York

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अंकिताचे डोळे पुन्हा पाणावले; म्हणाली

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा चौथा आठवडा आता सुरू झाला आहे. (Bigg Boss Marathi) गेले तीन आठवडे सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. (Bigg Boss Marathi) आता चौथ्या आठवड्यातही सदस्य धमाका करताना दिसणार आहेत. (Bigg Boss Marathi New Promo) गेल्या तीन आठवड्यांपासून सदस्य आपल्या घरापासून दूर आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ते नाती बनवताना दिसत आहेत. आजच्या भागात ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकरचे (Ankita Valawalkar) डोळे पुन्हा पाणावलेले पाहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील टीम B मधील सदस्य आज एकमेकांना समजावताना दिसणार आहेत . दरम्यान डीपी दादा अंकिताला प्रेमाने भेळ भरवतो. दरम्यान अंकिता म्हणते,”मला नात्यांची भीती वाटते… नॉमिनेट करण्याचा टास्क दिला तर”. यावर डीपी दादा म्हणतो,”कर मला नॉमिनेट”. तर पॅडी दादा म्हणतो,”जास्त नाती लावू नका..त्रास होतो नंतर”. पुढे डीपी दादा अंकिताला समजावतो.

Bigg Boss Marathi निक्की अन् वर्षा ताईंची नोकझोक पाहिलीत का?

निक्की आणि वर्षा ताईंची नोकझोक आजच्या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निक्की वर्षा ताईंनी म्हणत आहे,”पुढे बघायचं असतं माझ्या चेहऱ्यावर नाही”. त्यावर वर्षा ताई जान्हवीकडे पाहत म्हणतात,”एवढं सौंदर्य असताना मी दुसरीकडे का पाहू”. जान्हवीच्या बटांवर हात फिरवत वर्षाताई म्हणतात,”किती सुंदर या बटा”. वर्षा ताई पुढे म्हणतात,”बिग बॉस रागवतील माझ्यावर… कारण निरर्थक बडबड करण्याची मला सवय नाही”.

बालनाट्य अलबत्या गलबत्याचा विश्वविक्रम

Bigg Boss Marathi ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सत्याचा पंचनामा

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ,”आज होणार आहे सत्याचा पंचनामा”, असं म्हटलं जात आहे. तर ‘सत्याचा पंचनामा’मध्ये जान्हवी बसलेली असून ‘बिग बॉस म्हणत आहेत,”आपण या खेळात निक्की यांची सावली आहात. आपलं स्वत:चं असं अस्तित्व नाही”. त्यावर टीम B मधील सदस्य सहमती दर्शवतात.

Bigg Boss Marathi योगिता चव्हाण आणि निखिल दामले ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर!

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या जोरदार राडा सुरू आहे. या आठवड्यात डबल एविक्शन पार पडलं आहे. त्यामुळे निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोन सदस्यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला प्रवास संपला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात निखिल दामले, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img