20.4 C
New York

Mumbai High Court : उत्सवादरम्यान लेझर अन् कर्णकर्कश डीजेच्या वापरास आव्हान

Published:

सणात उत्सवात आणि मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सण आणि उत्सवांत मिरवणुकीसह इतर समारंभासाठी प्रखर दिव्यांचा वापर (लेझर बीम), कर्णकर्कश डिजेचा सर्रास वापर केला जातो. या वापराविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान देण्यात आलं आहे. लेझर आणि कर्णकर्कश डीजेच्या वापरास उत्सवा दरम्यान जनहित याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आहे. अनेक सण उत्सवामध्ये लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला असून काहींना कायमची दृष्टी गमवाली आहे. त्यामुळे, लेझर बीम आणि डिजेच्या वापराबाबात योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी यावेळी केली आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून दाखल करण्यात आलेल्या या जनहित याचिकेची मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. सण उत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषणाच्या नियमावलींचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शानास आणून द्यावे अथवा त्याबाबत माहितीचा समावेश असलेले निवेदन सादर करावे, असे आदेश न्यायालयाने (Mumbai High Court) याचिकाकर्त्यांना दिले. त्यानंतर, दोन्ही प्रदुषण नियंत्रण मंडळांनी त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करावी व उपाययोजना कराव्यात, असं कोर्टाने केलं स्पष्ट केलं आहे.

आज राज्यात मुसळधार, हवामान विभागाचा ‘या’ भागात यलो अलर्ट जारी

आत्तापर्यंत अनेकांची दृष्टी गेल्याची माहिती आसण उत्सवामध्ये वापरल्या जाणाऱ्या घातक लेझर बीममुळेहे. डीजे, मोठ-मोठ्याने वाजणारे गाणी आणि लेझर लाईट अशा उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होते, त्याचबरोबर यामुळे अनेकांची श्रवणशक्ती कमी झालेली आहे. अनेकांच्या ह्रदयाचे ठोके वाढल्याचे प्रकारही डीजे सुरू असताना वारंवार निर्दशनास येतात. त्याचबरोबर डीजेमुळे निर्माण होणाऱ्या अतितीव्र ध्वनी लहरींमुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील सत्येंद्र मुळ्ये यांनी न्यायालयाला (Mumbai High Court) सांगितले आहे.

विशिष्ट नियमावली लेझर बीममुळे निर्माण होणारा धोका दूर करण्यासाठी कोणतीही नाही. त्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी, निवेदन देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे, न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करून प्रतिवाद्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्यावतीने न्यायालयाकडे (Mumbai High Court) करण्यात आलेली आहे. डीजे आणि इतर उपकरणांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येते, मात्र, लेझर बीम संदर्भात माहिती घ्यावी लागेल, असे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने वग्यानी यांनी न्यायालयाला (Mumbai High Court) सांगितले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img