20.6 C
New York

Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेत घोटाळा, ईडी, सीबीआय चौकशी करा; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Published:

धुळे

मुख्यमंत्र्यांचा पोटातले ओठात येत आहे. आम्हाला सत्ता द्या लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin) पैसे दुप्पट करू, असे ते सांगत आहेत. आम्ही कधीही अशी भाषा वापरलेली नाही. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे सांगायला काहीही नाही. महिन्याला पंधराशे रुपये देऊन मते विकत घेण्याचा कार्यक्रम सरकारने केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे चुकीचे फॉर्म भरले असेल तर ती सरकारची चूक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच अशी चूक झाल्याची कबुली दिली आहे. लाडकी बहीण योजनेत गफला झाल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्रीच म्हणत आहेत, तर याची चौकशी ईडी(ED), सीबीआयकडून (CBI) करावी, असे पत्र मला केंद्र सरकारला पत्र लिहावे लागणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाला आहे, असं राज्याचे गृहमंत्री कबुल करत असती तर आता या योजनेचा तपास केंद्रीय तपास संस्था ईडी आणि सीबीआयकडे दिला पाहिजे, तसे पत्रच मी आता केंद्र सरकारला लिहिणार असल्याचे म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी, बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. बँकेत आणि सरकारी कार्यालयांमध्ये गोंधळ उडत आहे. यातून या सरकारचे मिस मॅनेजमेंट पुन्हा एकदा समोर आले, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, लाडकी बहीण योजना सुरु ठेवायची असेल तर आम्हाला पुन्हा सत्ता द्या, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पोटातील ओठांवर आले. पंधराशे रुपये देऊन महिलांची मतं विकत घेण्याचा घाट या सरकारने घातला आहे. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. सरकार स्थापनेसाठी यांनी घरं फोडली, पक्ष फोडले. अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष ओरबाडून घेतला. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन पक्ष फोडले गेले, हे या सरकारचे काम आहे, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवार साहेबांचे कौतूक भाजपचे लोक देखील करतात. राजेंद्र शिंगणे कुटुंबाशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. शिंगणे यांची बँक अडचणीत असल्याने ते अस्वस्थ होते. शिंगणे संवेदनशील नेते आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img