26.5 C
New York

Ajit Pawar : बारामती विधानसभेला जय पवार रिंगणात? अजितदादा, म्हणाले…

Published:

पुणे

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) वारे जोरात वाहू लागले आहेत. सत्ताधारी महायुतीकडून (MahaYuti) या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. यातच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बारामती विधानसभा (Baramati Assembly) मतदार संघातून निवडणूक लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी निवडणुकी संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे अजित पवार यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील चौथा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. खुद्द अजित पवार यांनीच या बातमीला दुजोरा दिला आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत जय पवार यांना संधी देणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर अजित पवार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

अजित पवार यांनी आज पुण्यात शासकीय ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुत्र जय पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. पत्रकारांनी जय पवार यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, उमेदवारी द्यायला पाहिजे किंवा नाही याबाबत जनतेचा आणि त्या भागातील काही कार्यकर्ते मागणी करतील ते करायला तयार आहे. मी सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही. शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img