15.6 C
New York

Crime News : धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

Published:

राजधानी पाटणामध्ये भाजप नेत्याला रात्रीच्या काळोखात गोळ्यी झाडून संपवल्याची धक्कादायक (Crime News) घटना घडली आहे. डेअरी बूथ ऑपरेटर हा भाजप नेता होता. ही घटना काल रात्री घडली. (BJP Leader Murder) आलमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंगपुरी कालव्याजवळ रात्री दहाच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. 50 वर्षीय अजय साह असं हत्या झालेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हत्या पूर्ववैमन्सातून करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हत्या पूर्ववैमन्सातून करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Crime News एफएसएल टीम घटनास्थळी

भाजप नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच पाटणा शहराचे एएसपी घटनास्थळी पोहोचले. या घटनेशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी पोहोचलेले पाटणा शहराचे एएसपी शरथ आरएस यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, एफएसएल टीमला पाचारण करण्यात आलं आहे. कुटुंबीयांचे जबाब घेण्यात येत आहेत. दोन क्रमांकाचे बदमाश बूथवर पोहोचले आणि नंतर बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी गोळीबार केला असंही ते म्हणाले आहेत.’

गायक दिनकर शिंदे काळाच्या पडद्याआड

Crime News पोलीस CCTV फुटेज तपासण्यात व्यस्त

रात्री साधारणतः दहा वाजताच्या सुमारास 50 वर्षीय अजय साह डेअरी बूथवर बसला होता. तेवढ्या एक दुचाकी तिथे आली आणि दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अजय साह यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अजय साह गंभीर जखमी झाले होते. डेअरी घराशेजारीच असल्यानं गोळ्यांच्या आवाजानं कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. त्यावेळी अजय साह यांच्यावर हल्ला झाला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याचं दिसून आलं. जखमी अजय साह यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना तातडीनं उपचार केंद्रात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img