20.4 C
New York

Prakash Ambedkar : आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Published:

मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने एससी आरक्षणात (Reservation) उप वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच एससी आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याच्या सूचना केल्या. न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपच्या (BJP) एससी, एसटी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली. या भेटीवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

1 ऑगस्ट 2024 चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी घटनादुरुस्ती आणा. आरक्षण धोक्यात आले असल्याचे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी ट्विट केले.

यामध्ये ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, कॅमेरे आपल्यावर स्थिर व्हावेत यासाठी नौटंकी करून आम्हाला वेड्यात काढू नका घटनादुरुस्ती आणा. हे फोटोशूट सुप्रीम कोर्टाने एससी यादीत उप-वर्गीकरण तयार करण्याचा राज्य सरकारांचा निर्णय रद्द करेल का? तर नाही. पंतप्रधान मोदी तुमच्या आश्वासनाला काही अर्थ नाही.

मी तुम्हाला आठवण करून देतो की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्यावतीने ॲटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाबतीत अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये क्रिमीलेयर आणि त्यांचे उप-वर्गीकरण लागू करण्याच्या बाजूने युक्तिवाद केला होता, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img