11 C
New York

Namo Shetkari Samman Nidhi : नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Published:

संदिप साळवे, पालघर

जव्हार तालुक्यात आजही खरीप हंगामातील शेतीवर येथील कुटुंब अवलंबून आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील १२ हजार सहाशे शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. त्यानुसार मागील वर्षी राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Samman Nidhi) सुरू केली. त्याचा पहिला दुसरा हप्ता टप्प्याटप्प्याने देण्यात आला. त्यानंतर २८ फेब्रुवारीला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीअगोदर दोन्ही एकदम हप्ते दिले. मात्र, पाच महिन्यांपासून राज्याच्या नमो शेतकरी (Farmers) महासन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना ओढ लागली आहे.

शेतकऱ्यांची शेती ही हवामानावर अवलंबून असते. पोषक हवामान मिळाले तरच शेतीत चार पैसे मिळतात. त्यातच पिकाला उत्पादन खर्चावर आधारित आवश्यक तो हमीभाव मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही चांगले मिळत नसल्याने त्यांनी काढलेली कर्जे भरली जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली.

त्याअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात. त्या योजनेंतर्गतच राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मागील वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री असताना त्यांनी त्याची घोषणा केली होती. त्याचे तीन हप्ते आतापर्यंत देण्यात आले आहेत. मात्र, फेब्रुवारीत तिसरा हप्ता दिल्यानंतर जून महिन्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांना राज्याच्या हप्ता मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, शेतकऱ्यांना पाच महिने झाले, तरीही राज्य सरकारचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता फेब्रुवारीनंतर मिळालेला नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी उसने-पासणे करून, कर्ज काढून पैसे घेतले आहेत. सध्या पेरणीनंतर आंतरमशागत आणि खते, कीटकनाशके फवारणीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ताची आस लागली आहे. असे लाभार्थी मिलिंद बरफ यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img