15.6 C
New York

Ajit Pawar : अजित पवार यांची सुप्रिया सुळे संदर्भात कबुली म्हणाले, ही मोठी चूक…

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात चुरशीची लढत झाली होती. ही लढत संपूर्ण राज्यामध्येच चर्चेचा विषय ठरली होती. आता विधानसभेच्या (Assembly Elections) तोंडावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलंय. बारामतीमध्ये बहिणीविरोधात उमेदवारी देऊन मी चूक केली, अशी कबूली अजित पवार यांनी दिलीय.

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. यामध्ये सुप्रिया सुळेंचा मताधिक्याने विजय तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत असताना अजित पवारांना बहिणीविरूद्ध बायकोला उभं केल्याची चूक मान्य केलीय. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या असल्याचं दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img