24.6 C
New York

Ajit Pawar : लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी येणार? सांगताना अजित दादा गोंधळे

Published:

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महायुती (Mahayuti) सरकारनं अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करताना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरूवात केली. या योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. अशातच आता राज्यातील (Maharashtra News) महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात कधी येणार, याची आतुरता लागली आहे.

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं सांगितलं. तसेच, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रच खात्यात जमा होणार आहे, असंदेखील सांगितलं. पण, आज अजित पवारांनी (Ajit Pawar) मालेगावात बोलताना लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीजेला महिलांच्या खात्यात जमा होतील, असं म्हटलं. अजित पवारांच्या वक्तव्यानं काही काळासाठी संभ्रम निर्माण झाला. अजित पवारांना पण, काही क्षणातच जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं.

अजित पवार आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. मालेगावात बोलताना अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली अनेक ठिकाणी महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकींचे सत्रही सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेची रणनिती आखण्यात आली.

Ajit Pawar बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार झाली. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव, विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप, जागांची निवड यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी या बैठकीनंतर संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, त्याबद्दल माहिती दिली.

Ajit Pawar 15 दिवसात कार्यक्रम

राज्यात भाजपचे जिल्हा विस्तारित कार्यकारी अधिवेशन लवकरच पार पडले. कार्यकर्त्यांशी आगामी निवडणुका समोर ठेवून संवाद साधण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक विधानसभा निहाय अधिवेशनही पार पडले. राज्यातील 288 जागांवर, मंडल युनिटवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योजना सुरु केल्या जातील. येत्या 15 दिवसात हा कार्यक्रम नियोजित करण्यात येईल, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

Ajit Pawar लवकरच जागावाटपाची चर्चा

त्यासोबतच जागा निश्चित करणे, आता सुरु करायला हवे. त्याचा फॉर्म्युला निकष, जागांची वाटप, त्याची निश्चिती केली आहे. लवकरच त्याचे वाटप होईल. त्यासोबतच लवकरच जागावाटपाची चर्चा सुरु होईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते निवडणुकांच्या पुढच्या प्लॅनबद्दल भाष्य करतील. महादेव जानकर यांनी केलेल्या जागेच्या मागणीवर मी काहीही बोलणार नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यांच्याशी बोलतील, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.

कागलमध्ये महायुतीचं ठरलं! अजितदादांकडून ‘या’ नेत्याच्या नावाची घोषणा

दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निकालानंतर संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या भाजपकडून पक्षातील जुने, माजी पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.केलं. अजित पवार म्हणाले की, राज्यांत विधानसभा निवडणूका येणारं आहेत. आपण महायुती म्हणुन सामोरे जाणार आहोत. तत्पूर्वी चांगल्या योजना आपण आणल्या आहेत. गरीब घरात जन्माला आलेल्या मुलींसाठी देखील योजना आणल्या आहेत. महिला सबलीकरण करण्यासाठीं योजना आहेत. महायुती घटक पक्षांनी स्वागत केलं. आपलयाला सर्वांना एकोप्याने निवडणुकांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळें आम्ही एकत्रित दौऱ्ये करणार आहोत. घटक पक्षांच्या सर्वांनी एकत्रित काम करायचं आहे यासाठी आवाहन करणार आहे. युतीचं सरकार आलं पाहिजे त्यासाठी नागरिकांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे.”

Ajit Pawar लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी येणार? अजित दादा चुकून काय बोलून गेले?

“राज्यांत महायुतीच सरकार आलं, तर वीज माफी सह सगळ्या योजना आम्ही चालू ठेऊ. जवळपास काही महिने आणि पुढील 5 वर्ष याचा हिशोब काढला तर 1 लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम कमी नाही. इच्छेला मुरड घालावी लागणार आहे.” पुढे बोलताना अजित दादा चुकून भाऊबीज बोलले, आम्ही 17 तारखेला पैसे देणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला

17 ऑगस्टलाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे,राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून 17 ऑगस्ट रोजी हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. यावर निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img