24.6 C
New York

Ajit Pawar : कागलमध्ये महायुतीचं ठरलं! अजितदादांकडून ‘या’ नेत्याच्या नावाची घोषणा

Published:

सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) जोरदार तयारी सुरू केली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. अशातच आता महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला. कागलमधन राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हसन मुश्रीफ यांच्या नावाची घोषणा केली.

अजित पवार हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. मुश्रीफ हे पवार कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जात होते. राष्ट्रवादी फुटल्यानंतर मुश्रीफ यांनी अजितदादांना साथ दिली होती. महायुतीत आल्यापासूनच आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास मुश्रीफ यांना होता. तर महायुतीत ही जागा भाजपकडे जाईल आणि समरजित घाटगेंना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, महायुतीकडूनन अजित पवारांनी मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली.

फडणवीसांच्या नादी लागू नका, जरांगेंचा राणेंना इशारा

मुश्रीफ यांना इतक्या उच्चांकी मतांना निवडून द्या की, समोरच्याला धडकी भरली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी कागलकरांना केलं. हसन मुश्रीफ यांची ही सातवी विधानसभा निवडणूक असणार आहे. या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजयी झाले. युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या संजयबाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता.

Ajit Pawar समरजित घाटगे काय करणार?

अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यापासून कागलमध्ये भाजप नेते समरजित घाटगे अस्वस्थ झाले होते. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. कागलची जागा राष्ट्रवादीकडे जाणार की भाजपकडे, यावर सातत्याने चर्चा सुरू होती. अशातच अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं आता समरजित घाटगे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img