17.6 C
New York

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे अहमदशाह अब्दालीचे लोक – संजय राऊता

Published:

मुंबई

ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे आणि राज ठाकरेंवर (Raj Thackeray) नाव न घेता सडकून टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी दिल्लीतील अहमदशाह अब्दालीने (Amit Shah) काही नेत्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत. यात महाराष्ट्रातील दोन-तीन प्रमुख नेत्यांना अहमदशाह अब्दालीने कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली आहे. पण मर्दाची अवलाद असते तर समोरून हल्ला केला असता अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांवर टीका केली आहे.

बीडमध्ये मनसे प्रमुखांसोबत जे घडलं, त्याच शिवसेना पक्ष म्हणून आमचा काहीही संबंध नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र कालची घटना अॅक्शनला रिअॅक्शन असे कोण म्हणत असेल, काळोखाचा फायदा घेऊन तु्म्ही जे काही फेकलं. मात्र अंधाराचा फायदा घेतल्याने तुम्ही वाचलात. तुम्ही मर्दांची औलाद असता तर समोर येऊन केलं असतं. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की असं काही करु नका. तुमच्या घरात तुमचे आई-वडील वाट पाहतात, तुमची पत्नी मुलं वाट पाहतात, असा इशारा देखील हल्लेखोरांना संजय राऊत यांनी दिला.

महाराष्ट्रात जे घडतंय त्याची मजा दिल्लीत अहमदशाह अब्दाली घेत आहे. महाराष्ट्र आपआपसाठी लोकांना लढवण्यासाठी अहमदशाह अब्दालीन काही प्रमुख नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे. या सुपाऱ्या कशा वाजतात, हे तुम्ही काल पाहिलं, अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.

मी कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही कारण हे सगळं दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीच्या इशाऱ्यावरुन चाललं आहे. याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्पना आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img