एका तरुणाला मुंबईतील मानखुर्द (Mumbai News) रेल्वे स्थानकाबाहेरील ऑटोरिक्षा स्टँडवर रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण प्रकार स्थानिक लोकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून लवकरच दोषींविरोधात कारवाई करण्याचे अश्वासन दिले.सोहेल अन्सारी असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव असून त्याचा रिक्षाचालक अकील युनूस याच्यासोबत शाब्दिक वाद झाला. या वादातून अकीलने सोहेलला हाताने, पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर अन्य दोन रिक्षाचालकांनी सोहेलला मारहाण केली. या घटनेचे चित्रण समाजमाध्यमांवर व्हायरल झाले.
एक्स प्लॅटफॉर्मवरील गोवंडी सिटिझन्स वेलफेअर फोरम या खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यानंतर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने वायरल झाला. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. शहरात रिक्षा माफियांची वाढ होऊ लागली असून एकाने असे म्हटले की त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मानखुर्द आणि गोवंडीसारखी ठिकाण मुंबईचा भाग आहे, यावर विश्वास बसत नाही. आणखी एका युजरने म्हटले आहे की, गोवंडी आणि मानखुर्दसारख्या परिसरात अशा घटना नेहमीच घडत असतात.
ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरात पडसाद
सोहेल अन्सारी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे मानखुर्द पोलिसांनी सांगितले, . तर, अकील युनूस असे रिक्षाचालकाचे नाव आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर सोहेल आणि अकील युनूस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर दोघांमधील वाद शिगेला पोहोचला आणि युनूसने सोहेलला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केली. इतर दोन रिक्षा चालकांनीही त्यानंतर सोहेलला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली. मानखुर्द पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.