19.4 C
New York

Maratha Reservation : राज ठाकरे नंतर मराठा आंदोलकांनी ‘या’ नेत्याची गाडी अडवली

Published:

सोलापूर

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा बांधव (Maratha Andolak) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोलापूरमध्ये (Solapur) मराठा बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची गाडी अडवली. मराठा आरक्षणाबाबत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली.

शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली आहे. शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सकाळी 11 वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत पवार हे बार्शीत आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला ही उपस्थित राहतील.

आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत आपली आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवताच शरद पवार यांनी दरवाजा उघडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठिंबा आहे, असे म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img