17.6 C
New York

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’मध्ये ‘खिलाडी कुमार’ लावणार हजेरी

Published:

‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) सध्या प्रेक्षकांचा भरपूर मनोरंजन करताना दिसत आहे. या शोचा होस्ट रितेश देखमुख (Riteish Deshmukh) देखील घरामधील सदस्यांचा आणि प्रेक्षकांना मनोरंजनाचा भरपूर डोस्ट देत आहे. यातच आज हा डोस्ट डबल करण्यासाठी बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) बिग बॉस मराठीच्या घरात हजेरी लावणार आहे.

अक्षय कुमारसह संपूर्ण ‘खेल खेल में’ या चित्रपटाची टीम बिग बॉस मराठीमध्ये कल्ला करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा ‘भाऊचा धक्का’ एकदम झापुक झुपुक होणार आहे. भाऊचा धक्कामध्ये शनिवारी रितेश देशमुखने घरातील काही सदस्यांना चांगलाच धडा शिकवला तर काही सदस्यांचा कौतुकही केले. आज भाऊचा धक्का कार्यक्रमात घरातील सदस्यांना भेटायला अक्षय कुमार देखील येणार आहे. नुकतंच सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

स्वतः लोकांच्या जीवाशी खेळून आपण मृत्यूला आमंत्रण द्यायचं – जॉन

नव्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावरुन अक्षय कुमार वर्षाला म्हणतोय,”वर्षा किती वर्षांनी दिसतेस” तर यानंतर डीपीला विचारतो,”घरात मटन मिळतंय की नाही”. तर त्यानंतर सूरजच्या स्टाईलने भाऊच्या धक्क्यावर रितेश आणि अक्षय कुमार झापुक झुपुक थिरकताना दिसत आहे. त्यामुळे आज भाऊचा धक्का एकदम ‘खेल खेल में’ स्टाईलने होणार हे मात्र निश्चित आहे.

आज अक्षय कुमारसह फरदीन खान, वाणी कपूर, अम्मी विर्क, प्रज्ञा जायसवाल आणि आदित्य सील हे कलाकारदेखील ‘भाऊच्या धक्क्या’वर हजेरी लावणार आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम खूपच भारी होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img