19.2 C
New York

Paris Olympics : भारताची ऑलिम्पिक मोहिम थांबली

Published:

पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारताची मोहिम (Paris Olympics) आता संपली आहे. किर्गिस्तानची खेळाडू एपेरी काइजीचा सेमीफायनल राउंडमध्ये पराभव झाला. जर किर्गीस्तानची रेसलर फायनल राउंडमध्ये पोहोचली असती तर रितीका हुड्डाला कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. रितीका हुड्डा पदकाच्या शर्यतीतून बाहेर होताच भारताचा ऑलिम्पिक (India at Olympics) स्पर्धेतील मोहिम सुवर्णपदकाविनाच थांबली.

या स्पर्धेत भारताने फक्त सहा पदके जिंकली. यात एकही सुवर्णपदक (Gold Medal) नाही. पाच कांस्यपदके आणि अवघ्या एक रजत पदकाची (Silver Medal) कमाई भारताने केली. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारताला रजत पदक मिळवून दिले. तर नेमबाजीत तीन कांस्यपदके मिळाली. कुस्ती आणि हॉकीत (Indian Hockey) प्रत्येकी एक कांस्यपदक मिळाले. कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) अपात्र ठरली नसती तर कदाचित एक सुवर्णपदक भारताला मिळालं असतं. आता विनेश फोगटच्या बाबतीत जो निर्णय यायचा तो आज येईलच. पण एकूणच या स्पर्धेत भारताला एकही सुवर्णपदक मिळालं नाही. सुवर्णपदक नाही म्हटल्यानंतर भारताचं अभियान अपयशीच मानलं जाईल.

या स्पर्धेत भारताला पहिलं पदक नेमबाजीत मिळालं. मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात ब्राँझ पदक मिळवलं. दुसरे पदक मनू भाकरने मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये मिळवलं. तिसरे कांस्यपदक महाराष्ट्राचा स्वप्निल कुसाळेने (Swapnil Kusale) मिळवून दिलं. यानंतर पुरुष हॉकीमध्ये एक कांस्यपदक जिंकता आलं. तर भालाफेकीत नीरज चोप्राने रजत पदकाची कमाई केली. याआधीच्या टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये (Tokyo Olympics) नीरजने गोल्ड मेडल मिळवलं होतं. यावेळीही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती. मात्र नीरज तशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) चांगली कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं. तर नीरज चोप्राला सिल्व्हर मेडलवरच समाधान मानावं लागलं. यानंतर स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात रेसलर अमन सहरावतने 57 किलो फ्री स्टाइल प्रकारात कांस्यपदक पटकावलं.

Paris Olympics टोक्योचं रेकॉर्डही तुटलं नाही

याआधी 2020 मध्ये जपानच्या टोक्यो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धेत भारताने एकूण सात पदके जिंकली होती. ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातील भारताचं हे सर्वोत्तम प्रदर्शन होतं. पॅरिसमध्ये यापेक्षाही चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय खेळाडूंकडून होती. परंतु, भारतीय खेळाडू ढेपाळले. एकालाही सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही. त्यातुलनेत चीन अमेरिकेच्या खेळाडूंनी तर पदकांचा पाऊसच पाडला. भारताला कशीतरी सहा पदके मिळवता आली.

Paris Olympics भारताचे पकदवीर

मनू भाकर – ब्राँझ मेडल, शुटींग
मनू भाकर/सरबज्योत सिंह, शुटींग
स्वप्निल कुसाळे- ब्राँझ मेडल, शुटींग
हॉकी टीम – ब्राँझ मेडल
नीरज चोप्रा – सिल्व्हर मेडल, एथलेटिक्स
अमन सहरावत – ब्राँझ मेडल, रेसलिंग

Paris Olympics 112 खेळाडू, 69 इव्हेंट पण एकही गोल्ड नाही

या स्पर्धेत भारताच्या एकूण 112 अॅथलिट्सने 69 मेडल इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. पाच राखीव खेळाडूही होते. शुटींग, अॅथलेटिक्स, हॉकी आणि कुस्ती या प्रकारांतच पदके मिळू शकली. तसं पाहिलं तर आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धांचा विचार केला तर भारताला एकूण 41 पदके मिळाली आहेत. यामध्ये अभिनव बिंद्रा (2008) आणि नीरज चोप्रा (2020) या दोघांनाच सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळालं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img