15.6 C
New York

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांच्या वीज बिल संदर्भात फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Published:

अकोला

शेतकऱ्यांना (Farmers) 365 दिवस आम्ही वीज देणार आहे. सोलार एनर्जीमुळे हे शक्य होणार आहे. ही काँग्रेसची लबाड योजना नाही. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचे बिल द्यावे लागणार नाही. महायुती (Mahayuti) सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज (Electricity Bill) देण्याचा निर्णय घेतला आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मिळाव्यात फडणवीस बोलत होते

देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडक्या बहिनीचा त्रास आता मविआला होऊ लागला. ते कोर्टात गेले. तुम्ही सोन्याचा चमचा घरून जन्माला आले पण 1500 रुपयांचे महत्व आमच्या गृहिणीला विचारा. पण आमच्या बहिणीच्या लक्षात आलं की हे सावत्र भाऊ आहे. यांच्यापासून सावधं राहिलं पाहिजे. सप्टेंबरमध्ये आपण बहिणीला हप्ता देणार आहोत. शेतकऱ्यांना 365 दिवस आम्ही दिवसाची वीज देणार आहोत. काँग्रेसची ही लबाड योजना नाही आहे. पुढची पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचे बिल येणार नाही, असा दावा त्यांनी केला. गेल्या 3 महिन्यात वातावरण बद्दले आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय नियोजनपूर्वक घेतला. आपला निर्णय काँग्रेस सारखा नाही. हे कसे लबाड आहेत, तेच आपसात सांगू लागले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. सरकारवर कुठलाही बोजा न पडता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल. पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही. शेतकऱ्यांचे विचार करणारे हे सरकार आहे. विदर्भातील दुष्काळ संपवणारा वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीने एवढे वर्ष राज्य केले, मात्र त्यांनी कधी विदर्भाच्या सिंचन प्रकल्पाला निधी दिला का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या ठिकाणी हिंदू दुर्बल होतो, त्या ठिकाणी त्यांना गुलामीचा सामना करावा लागतो. हिंदू मजबूत असल्यास राज्य करतो. कुठल्या जाती, धर्माला कमी लेखायचे नाही. बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे. आज तोच प्रयोग आपल्याकडे सुद्धा सुरू झाला. मतांसाठी काही पक्ष बांगलादेशीयांना संरक्षण देण्याचे काम करीत आहे, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. अकोला येथे ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दररोज खोटी माहिती पसरवून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम विरोधक करतात, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आता खोटारडेपणाविरोधात पोलखोल उपक्रम राबविणार आहे. समाज माध्यमांचे महत्त्व जाणून घ्या, असे देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img