15.6 C
New York

Ajit Pawar Death Threat : अजित पवार यांच्या जीवाला धोका, गुप्तचर विभागाकडून अलर्ट

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सध्या राज्यात जन सन्मान यात्रा सुरू आहे. यातच आता अजित पवार यांच्या सुरक्षेचे संदर्भात गुप्तचर विभागाकडून अलर्ट (Ajit Pawar Death Threat) देण्यात आला आहे. अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं गुप्तचर विभागाने (State Intelligence Department) पोलिसांना सांगितले आहे.

अजित पवारांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घ्या, गुप्तवार्ता विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. अजित पवार उद्या मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना आहे.

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धुळे, जळगाव जिल्ह्यासह मालेगाव मध्यचा दौरा आहे. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात अनेक दहशतवादी संघटनांकडून धोकादायक हालचाली होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img