24.6 C
New York

Bigg Boss Marathi : वैभव आणि इरिनाला एकत्र पाहून ‘ती’ ढसाढसा रडली

Published:

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) नव्या सीझनमध्ये रोज काहीतरी नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. नॉमिनेशनच्या कार्यामध्ये हटके जोड्या जुळवून ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना मोठ्या पेचात घातलं होतं. ‘बिग बॉस’ चा प्रत्येक सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो – भांडणं, जोड्या, खेळ आणि इतर अनेक गोष्टी. पण यंदा घरातील एका सदस्याच्या आयुष्यात एक विशेष परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या सदस्याचं नाव आहे आर्या. अमरावतीची ही धाकड गर्ल पहिल्या दिवसापासून चांगला खेळ खेळत सर्वांना चांगली स्पर्धा देत आहे. पण ज्यामुळे आर्या ढसाढसा रडली असं काय घडलं ? हे जाणून घेऊया.

गेल्या काही दिवसांत वैभव इरिनाच्या मागे-पुढे फिरताना दिसत आहे. जान्हवीने इरिनाला “फॉरेनची पाटलीण” असे संबोधले होते. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये वैभव इरिनाबद्दल “ही किती क्यूट आहे रे…”असे म्हणतो, ज्यामुळे आर्याचे अश्रू अनावर होतात आणि ती ढसाढसा रडू लागते. “मी हे सगळं पाहू शकत नाही,” असं ती आपल्या मित्रांना सांगते. यानंतर वैभव स्वतःच तिच्याशी बोलायला जातो.

गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा गेम कळला नाही

वैभव आर्याला विचारतो, “तुला नक्की काय झालंय? कारण, मी माझ्या बाजूने असं काहीच वागलोय असं वाटत नाही.” यावर आर्या उत्तर देते, “मला तू आकर्षक वाटतोस… आणि तुला न वाटलं तरी मला तुझ्यावर आकर्षण निर्माण होऊ शकतं.” ‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’ने हा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये आर्या प्रचंड रडताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी ‘बिग बॉस’ने शेअर केलेल्या प्रोमोवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रतिक्रिया अशी आहेत: “हे काय होऊन गेलं… काहीही!”, “माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच बालिश आहे”, “आर्या, प्रेमात पडू नकोस!”, “अरे देवा, काय चाललंय?”, “हे काय प्रकार आहे?”, नेटकऱ्यांनी “ही आर्या वेडी झाली आहे का?” अशा कमेंट्स दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img