26.5 C
New York

Ajit Pawar : आमचं बटन दाबलं तरच …काय म्हणाले अजित पवार?

Published:

आमचं बटन दाबलं तरच ही लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. कारण ही योजना आम्ही सुरू केलेली आहे. यामधून कुठून खर्च करायचा, कुठून पैसा आणायचा याचा सगळा अभ्यास आम्ही केला आहे. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पाठवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही आमचं बटन दाबा म्हणजे ही योजना चालू राहिलं असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्याला मतदान करावं असा आवाहनच त्यांनी यावेळी केलं आहे.

ते नाशिक येथे जन सन्मान यात्रेत बोलत होते. मी जर सरकारमध्ये नसतो, तर लाडकी बहीण योजना देता आली असती का? असं म्हण मला कुणाशी तुलना करायची नाही मात्र, हे काम जनतेसाठी करायची भावना असल्याने हे मी केलं आहे. असही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, माध्या बहिणी, भावांनो आम्हाला यावेळी आशिर्वाद द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आश्वासनही अजित पवारांनी यावेळी उपस्थितांना दिलं आहे.

जागावाटप, मुख्यमंत्रिपदाचा चेहर्याबाबत राऊतांचे मोठे वक्तव्य

Ajit Pawar दुसऱ्या गाडीत होतो

अजित पवारांचं जन सन्मान यात्रेच्या पहिल्या दिवशी स्वागत होत असताना कार्यकर्त्यांनी नरहरी झिरवाळ साहेब कुठे आहेत असा प्रश्न केला. यावेळी अजित पवारांनी नरहरी झिरवाळ यांच्या बाबत सूचक विधान केलं, नरहरी झिरवाळ कुणाच्या गाडीत कोणाला माहित? त्यांनी असं विधान केलं होतं. मात्र, नंतर त्यांनी मी दुसऱ्या गाडीत होतो, ते दुसरीकडे होते, असे सांगत सारवासारव केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img