20.6 C
New York

Maharashtra Elections : आज ‘या’ नेत्याकडून होणार नव्या आघाडीची घोषणा?

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Elections) आता दोन महिन्यांपेक्षाही कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाविकास आघाडी अभेद्य राहिली. विधानसभेतही हाच प्रयोग राबविण्यासाठी आघाडीचे नेते प्रयत्न करत असून यात त्यांना यश येताना दिसत आहे. मात्र महायुतीत वेगळ्या धुसफूस वाढू लागली आहे. शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. खरंच जर असं घडलं तर महायुतीच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत अमरावतीत मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार देऊन महायुतीला धक्का दिला होता. त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याने मत विभाजन होऊन नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडू वेगळे संकेत देत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांची तिसरी आघाडी असेल असे वक्तव्य केले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता आहे. आज बच्चू कडू संभाजीनगरात आहेत. येथे मोर्चा काढणार आहेत. याच वेळी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतात.

बच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात

काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी तिसरी आघाडी शेतकऱ्यांची असेल. आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे आज बच्चू कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बच्चू कडू यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच महाविकास आघाडीचीही गणिते बदलण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img