24.6 C
New York

Bigg Boss Marathi : गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा गेम कळला नाही

Published:

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन (Bigg Boss Marathi ) प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि गोलीगत सूरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आला. गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ कळलाच नाही, अशी चर्चा होऊ लागली आहे. (Bigg Boss Marathi New Season) मात्र त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील सूरजच्या खेळीचं कौतुक केलं. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi New Promo) नव्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणतेय,”सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं”. त्यावर पॅडी म्हणतो, ‘बिचारा बाहेर देखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता’. त्यावर अंकिता म्हणते, ‘सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली’. टिक टॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलीगत सूरज चव्हाणचं नेटकऱ्यांकडून चांगलच कौतुक होत आहे.

Bigg Boss Marathi निक्कीनं केलं छोटा पुढारीला किस

बिग बॉसचा घरातील नवा प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी या दोघांची चांगलीच मैत्री बहरताना दिसत आहे. यामध्ये धनश्याम निक्कीला बोलतो की, तू माझ्यासोबत कसंही वाग पण मी तुझ्यासोबतच प्रेमानेच वागणार. निक्की छोटा पुढारीला घट्ट मिठी मारताना या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आणि पुढे निक्की तांबोळी छोटा पुढारीला गालावर किस करतानाही पाहायला मिळत आहे. यानंतर घनश्याम मात्र लाजेने लाले-लाल झाल्याचं बघायला मिळाले आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे. आज टीव्ही टास्क ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार आहे. बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण घन:श्याम हे करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img