24.6 C
New York

Bachchu Kadu : बच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात

Published:

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. समाजकल्याण विभागाकडून (Social Welfare Department Officer) दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा (E-Rickshaw) खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली.

कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. या तयारीचा एक भाग म्हणून त्यांनी 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरनमध्ये शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर एका मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी कडू गुरुवारी शहरात आले होते. यावेळी काही दिव्यांग बांधवांनी समाजकल्याण विभागाने दिलेल्या ई-रिक्षांमध्ये एका दिवसात बिघाड झाल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. ई-रिक्षा वाटपानंतर त्या तात्काळ नादुरूस्त झाल्याने कडू यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, ई-रिक्षात बिघाड झाल्यासंदर्भात कडू यांनी आपल्या स्टाईलने अधिकाऱ्यांना या प्रकाराच जाब विचारला. यावेळी अधिकारी आपले स्पष्टीकरण देत असतांना अचानक कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. दिव्यांगांना दिलेले वाहन खराब असल्याने कडू चांगलेच संतापले होते.

दुसरीकडे बच्चू कडू यांचा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये महामोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. संभाजीनगर पोलिसांनी कडू यांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे. याविषयी पत्रकारांशी बोलताना कडू यांनी आपला मोर्चा कोणत्याही स्थितीत निघणार असल्याचं सांगितलं. आमचा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत निघेल, त्यामुळं पोलिसांनी तो अडवण्याचा धाडस करू नये, अन्यथा आम्ही प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img