15.6 C
New York

Vinesh Phogat : भारताला धक्का! कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र

Published:

पॅरिस ऑलिम्पिकमधून मोठी धक्कादायक बातमी येत आहे. विनेशने (Vinesh Phogat) महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतू ती ५० किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. (Vinesh Phogat disqualified)पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला चौथं पदक निश्चित करून देणारी कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन जास्त होते. इंडियन एक्सप्रेसने सकाळी दिलेल्या वृत्तानुसार विनेशचे वजन जास्त होते. यांनतर आता तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही आणि ५० किलोमध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते असतील.

विनेशने मंगळवारच्या लढतीसाठी वजन केले होते. नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या कुस्तीपटूचे वजन मंगळवारी रात्री अंदाजे २ किलो वजन जास्त होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते अपुरे पडल्याने विनेशला आता अपात्र ठरवण्यात आले आहे.

‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करत आहे. तसेच तिच्यावर कोणतीही टीका केली जाऊ नये. यापुढे यावर काहीही बोलले जाणार नाही. आम्हाला अन्य खेळांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img