15.6 C
New York

Bangladesh : बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन

Published:

गेल्या अनेक दिवसांच्या राजकीय गोंधळानंतर बांगलादेशमध्ये (Bangladesh) अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशातील अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. देशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली बंग भवन (राष्ट्रपती भवन) येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंदोलक विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांचा अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही सेना प्रमुखांनीही या बैठकीला हजेरी लावलेली.

८४ वर्षांचे डॉ. युनूस अंतरिम सरकारचा कार्यभार स्वीकारणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी देश सोडून पळून गेलेल्या शेख हसीना यांच्यावरही जोरदार घणाघात केला. युनूस म्हणाले, आज देश स्वतंत्र झाला. शेख हसीना यांच्या कार्यकाळापर्यंत इथे लोकं गुलामासारखे जीवन जगत होते. शेख हसीना यांची वागणूक हुकूमशाहीसारखी होती. त्यांना संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवायाचं होतं. आज देशातील जनतेची खऱ्या अर्थाने सुटका झाल्यासारखं वाटत आहे.

Bangladesh शांततेचा नोबेल पुरस्कार

गरीब जनतेला बँकिंग सुविधा देण्याच्या युनूसच्या प्रयोगामुळे बांगलादेशला सूक्ष्म कर्जाचं केंद्र म्हणून ओळख मिळाली. युनूस सध्या देशाबाहेर आहेत. परंतु, त्यांनी शेख हसीनांच्या हकालपट्टीचं स्वागत केलं आणि या विकासाला देशाची ‘दुसरी मुक्ती’ असं म्हटलं आहे. ग्रामीण बँकेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन मोहिमेसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांची पद्धत वेगवेगळ्या खंडात अवलंबली गेली आहे.

सोमवारी नाऊशी म्हणाले की, हसीना देशातून बाहेर पडल्यानंतर 1971 च्या पाकिस्तानपासून स्वातंत्र्यासाठी झालेल्या युद्धानंतर बांगलादेशसाठी हा ‘दुसरा मुक्ती दिवस’ ​​आहे. युनूस सध्या पॅरिसमध्ये असून तिथे त्याच्यावर किरकोळ वैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, हसीना विरुद्धच्या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विनंतीला त्यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याची विनंती मान्य केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img