26.5 C
New York

Dadar Suitcase Murder : दादरला सूटकेसमध्ये डेडबॉडी, मित्राची हत्या करुन मृतदेह बॅगेत भरला 

Published:

मध्य रेल्वेमार्गावरील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी मध्यरात्री तुतारी एक्स्प्रेसमध्ये मृतदेह असलेली एक सुटकेस आढळून आली होती. याप्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. अर्शद अली सादीक अली शेख याची हत्या करुन या दोघांनी त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये (Dadar Suitcase Murder) भरला होता. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा ही सुटकेस तुतारी एक्स्प्रेसने (Tutari Express) कोकणात घेऊन चालला होता.

मुंबईतील वर्दळीच्या दादर रेल्वे स्थानकावर एका बॅगमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हत्येनंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरुन दोघे मित्र निघाले होते. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि रेल्वे पोलीस (GRP) सामान तपासणी करत असताना त्यांना सूटकेसमध्ये मृतदेह आढळून आला. हा खून पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे पोलिसांनी चौकशी केली असता उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि आरोपींमध्ये त्यांच्या मैत्रिणीवरुन वाद झाला होता. आरोपी जय चावडा आणि त्याचा साथीदार शिवजीत सिंग यांनी या वादानंतर मिळून अर्शद अली शेख याची हत्या केली.

मुंबईतील प्रभादेवीत शिंदे गट-ठाकरे गटात राडा

रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले होते. आठच्या सुमारास दोघे दारू पिऊन आले. तेव्हा अर्शद आणि शिवजीतमध्ये बाचाबाची सुरू होती. अर्शदच्या बायकोवरून शिवजीतसोबत त्याचे भांडण सुरु होते. याच बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी शिवजीतने अर्शदचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या बाटल्या फोडून त्यानेच त्याला ओरखडण्यास सुरुवात केली. जय त्यांच्या भांडणाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये काढत होता. त्याचदरम्यान शिवजीतने रूममध्ये पडलेल्या हातोडीने अर्शदच्या डोक्यात प्रहार केला.

एका संशयिताला रेल्वे स्थानकावर दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. दुसरा आरोपी पळून गेला होता, त्याला उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आली. मुकबधीर दोन्ही आरोपी आहेत त्यामुळे त्यांच्याशी संवाद सांकेतिक भाषेचा वापर करून साधून चौकशी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या मित्रासोबत मैत्रिणीवरून आरोपींचे भांडण झाले होते. पीडितेला मृत व्यक्तीच्या घरी पार्टीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि वाद टोकाला जाऊन हत्येपर्यंत पोहोचला. पोलीस अधिक तपास करत आहेत. ती तरुणीदेखील अर्शदला आणखी मारण्यासाठी प्रोत्साहित करत होती. यातील व्हिडीओ कॉलमधील व्यक्ती मास्टरमाइंड असून ती दुबईत असल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. हे व्हिडीओ रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. पोलीस पुढील तपास त्या अनुषंगाने आता करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img