24.6 C
New York

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर

Published:

नवी दिल्ली

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर (MLA Disqualification Case) सुनावणी होणार होती. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील आज होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवारांनी कोर्टाकडे वेळ मागितला. सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख (मेंशन) कोर्टासमोर करण्यात आला. अजित पवार गटाने 2 आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला होता. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायलयाने या महिन्यात दोन्ही प्रकरणी सुनावणी होणार नाही, असे आदेश दिले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यातच पुन्हा नव्याने याप्रकरणाची सुनावणी पार पडेल, असे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img