11 C
New York

Maratha Reservation : फडणवीस आणि शरद पवार यांच्या घरासमोर, मराठा ठोक मोर्चाचे आज आंदोलन

Published:

मुंबई

भारताच्या बाजूचा देश असलेल्या बांगलादेशमध्ये (Bangladesh) आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात मोठ्या प्रमाणात भडकले आहे. तसेच महाराष्ट्रात देखील गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय ज्वलंत होत चालला आहे. मराठा ठोक मोर्चाच्या वतीने (Maratha Kranti Thok Morcha Protest) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सर्व शरद पवार (Sharad Pawar) यांचे सिल्वर ओक बंगल्यावर आज आंदोलन करणार आहे.

गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आरक्षणावरुन विविध आंदोलन सुरु आहेत. आता याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील मुंबईत जबाब दो आंदोलन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ हे आंदोलन केले जाणार आहे. सध्या रमेश केरे पाटील हे मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन मोठ्या ताफ्यासह सागर बंगल्यावर रवाना झाले आहेत.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी “जवाब दो जवाब दो, देवेंद्र फडणवीस जवाब दो” या नाऱ्याखाली आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करतील. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन होत असल्याने मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेट्स टाकायला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img