26.5 C
New York

Heavy Rain : राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; मुंबईला यलो अलर्ट

Published:

आज (५ ऑगस्ट)रोजी मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी मुंबईत ऑरेंज अलर्ट होता. त्याचबरोबर दुसरीकडे, पुणे आणि सातारा सध्या ऑरेंज अलर्टच्या झोनमध्ये आहेत, घाटांच्या भागात मुसळधार पावसाची (Rain ) आणि मैदानी भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे.

हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये 40 किमी/ताशी वेगाने विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. यानंतर उद्या हवामान विभागाने ६ ऑगस्टपर्यंत पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

नद्या दुथडी भरून वाहत आहेत. राज्यातील बहुतांश धरणं भरत आली आहेत. कृष्णा, भीमा खोऱ्यातील त्यामुळे धरणांतील विसर्गात वाढ करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना, नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान गेल्या महिन्याभरात कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. घाटमाथ्यावर काही काळ पावसाचा जोर मंदावत असला तरी पुन्हा जोरदार सरी कोसळत आहेत. नगरमधील अकोले तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पडल्याने भंडारदरा धरण भरले. त्यातून निळवंडे धरणात विसर्ग सोडण्यात आला आहे.

Heavy Rain मराठवाड्यात काय स्थिती?

दुसरीकडे गेल्या चार-पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला असून, तुरळक ठिकाणी पावसाचा सडा पडत आहे. तर विदर्भाच्या पूर्व भागात हलक्या सरी आहेत. बुलडाण्यातील नरवेल, चांदूरबिस्वा मंडलात मध्यम पाऊस झाला. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने या भागातील नद्या अजूनही भरून वाहत आहेत. त्यामुळं धरणांतील पाणी पातळी वाढत आहे. तर इटियाडोह, कामठी खैरी ही धरणं शंभर टक्के भरली असून सिरपूर ८० टक्के, तोतलाडोह ८७ टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img