15.6 C
New York

Heavy Rain : पुण्यात रात्रभर संततधार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Published:

राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाचे थैमान (Maharashtra Rains) सुरू आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात अतिमुसळधार (Pune Rains) पाऊस झाला. या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा शहरात पावसाने हजेरी (Heavy Rain) लावली आहे. काल रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. त्यानंतर पुणे आणि शेजारच्या सातारा जिल्ह्यांना (Satara Rains) रेड अलर्ट जारी करण्यात आला (Red Alert) आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला अतिमुसळधार (Nashik) पावसाने झोडूपन काढले आहे. नाशिकमध्ये इतका पाऊस झाला आहे की गोदावर नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

पुण्यात कालपासून पाऊस होत आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपूर्वी जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे उपाययोजना करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून सकाळी ९ वाजता २९ हजार ४१४ क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, पुणे, सातारा, जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कही जिल्हे वगळता राज्यात इतर ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर चार तारखेनंतर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच नाशिक पुणे व कोल्हापूरच्या घाट विभागात ठिकाणी खूप जोरदार म्हणजे ११६ ते २००४ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागासाठी यलो अलर्ट दिलेला आहे. पुणे व परिसरातील पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागात ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत दुधात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट व्यवसायासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img