24.6 C
New York

Manoj Jarange : उगाच धमक्या देऊ नयेत अन्यथा…” जरांगेंनी पुन्हा दिला इशारा

Published:

भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात (Manoj Jarange) नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार नारायण राणेंनी मनोज जरांगेंना ताकीद दिली होती की त्यांनी देवेंद्र फडणवीस बोलू नये. तरीही ते जर बोलले तर मग आम्ही सुद्धा बोलणार. लोकसभा निवडणुकीत काय झालं होतं याचं आत्मपरिक्षण आम्ही सध्या करत आहोत, असे राणे म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला आज मनोज जरांगे पाटील यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. नारायण राणेंना उगाच मला धमक्या देऊ नयेत अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी सुनावलं आहे. जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं. मी त्यांना काहीच बोलत नाही. मी शांत आहे. पण जर मी बोलायला लागलो तर थांबणारा नाही. नारायण राणेंनी उगाच मला धमक्या देऊ नयेत. नारायण राणेच नाही तर अन्य कुणीही मला फुकट धमक्या देऊ नयेत. काहीही झालं तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहोत. माझा मराठा समाजही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदरच करतो. पण ते काय नवीन काढत आहेत असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

सध्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना काहीच सुचेनासे झाले आहे. त्यामुळे ते काहीच बोलत नाही. सरकार राहिल की नाही याचीच चिंता त्यांना जास्त वाटत आहे. हे बहुधा भाकरी खात नसावेत ताक पित असावेत. आता त्यांच्याकडून मला उचकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी त्यांना काहीच उत्तर देणार नाही. त्यांच्यासारखा मी माझा स्वाभिमान गहाण टाकलेला नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर केली.

Manoj Jarange गणेशोत्सवानंतर मराठवाड्यात जाणार

भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंनी (Narayan Rane) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) आव्हान दिलं. गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार असल्याचं राणे म्हणाले. तर मराठवाड्यात गेल्यावर जरांगे काय करतो बघू.मी गणेशोत्सव संपताच मराठवाड्यात जाणार आहे. सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणार. बघू तर जरांगे काय करतो, असं आव्हान राणेंनी काल सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img