आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. (Tamhini Ghat) पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. मुसळधार पावसाने रायगड-पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट खचला आहे. (Rain) ताम्हिणी घाट खचल्याने दुरुस्तीसाठी (दि. 5 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे. ताम्हिणी घाटात रस्ता पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका बाजूने खचला आहे. या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.मुळशी तालुक्यात गेली दोन आठवड्यांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिमुसळधार पावसामुळे रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पिरंगुट घाटामध्ये जागोजागी दरडी ही कोसळल्या आहेत.
गेल्या महिन्यात आदरवाडी येथील पिकनिक पॉईंट हॉटेलवर दरड कोसळल्याने हॉटेलमधील शिवाजी मोतीराम बहिरट यांचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला होता. आदरवाडी व डोंगरवाडी या गावाजवळील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असल्याने हा रस्ता खचलेला आहे. हे ठिकाण ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येतं. तसेच पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून ताम्हिणी घाट बंद करण्यात आला आहे.
रेड अलर्ट! काळजी घ्या, आज दिवसभरात मुसळधार बरसणार
पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तथापि पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दीही होत असते. त्यामुळे 5 ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले आहेत. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. ताम्हिणी घाटात रस्ता मुसळधार पावसामुळे एका बाजूने खचला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदचे निर्देश दिले आहेत.