20.4 C
New York

Anil Deshmukh : सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

Published:

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे वसुली कांड गाजले होते त्याच बाबतीत तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने (Sachin Waze) मोठा खुलासा केला आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे असेही वाझे यांनी सांगितले. सचिन वाझेंच्या या आरोपांनंतर खळबळ उडालेली असताना आता खुद्द अनिल देशमुख यांचीच प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.

मुंबई पोलीस दलातून निलंबीत केलेले अधिकारी सचिन वाझे (Sachin vaze) याने महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघेल असा बॉम्ब टाकला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सचिन वाझे याने गंभीर आरोप केले. सचिन वाझेने आरोप केल्यानंतर तासाभरातच अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच सचिन वाझे हा गुन्हेगार आहे. ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टाने म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी या वेळी दिला. ते नागपुरात बोलत होते.

‘देशमुख पैसे घ्यायचे’सचिन वाझेंचा आरोप,फडणवीसांना पत्र

अनिल देशमुख म्हणाले, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वाझेबद्दल बोलताना वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, असे म्हटले होते. दोन खुनाचा त्यांच्यावर गुन्हा आहे. त्यामुळे सचिन वाझेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं देखील हायकोर्ट म्हणाले होते. सचिन वाझे याला हाताशी धरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत.

Anil Deshmukh अनिल देशमुखांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

सचिन वाझेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच पलटवार केला आहे. अनिल देशमुख म्हणाले, चार पाच दिवसांपूर्वी मी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र पाठवले होते. मी केलेल्या त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप केला आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटले ते माहीत नाही का? (सचिन वाझे) गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी आहे. यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. परंतु त्याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप लावत आहे.

Anil Deshmukh काय म्हणाले सचिन वाझे?

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सचिन वाझेंनी म्हटलं की, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img