19.4 C
New York

Kalyan : कल्याण पश्चिमेत भलेमोठे होर्डिंग कोसळले

Published:

घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती कल्याण (Kalyan) याठिकाणी झाली आहे. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. 4 ते 5 गाड्या होर्डिंगखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. होर्डिंग पडल्याने 2 जण जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे…गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पण पुन्हा तशीच घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्यामुळे लोकांचे हाल झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पालिका अधिकारी आणि अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. होर्डिंगचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनी गोंधळ घाण्यास सुरुवात केली आहे. कोसळलेल्या होर्डिंला पालिका अधिकाऱ्यांकडून परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पण घडलेल्या घटनेमध्ये 4 ते 5 गाड्या अडकल्या असून 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचे 10 वर्ष झालं निर्जंतुकीकरण नाही ?

ज्या चौकामध्ये होर्डिंग पडलं आहे, त्या चौकात नॅशनल रुग्णालय असल्यामुळे अधिक खळबळ माजली आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना यावर माहिती दिली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची विचारपूस करण्यासाठी आलेल्या नातेवाईकाची गाडी देखील होर्डिंग खाली आल्याची माहिती मिळत आहे. ‘मी माझ्या कारमधून उतरलो आणि काही क्षणात होर्डिंग कोसळ्यामुळे माझा जीव थोडक्यात बचावला… माझ्या गाडीसोबत आणखी काही गाड्या होर्डिंग खाली अडकल्या आहेत…’ अशी माहिती नागरिकाने दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img