24.6 C
New York

Ramdas Athawale : …तर पुढचा मुख्यमंत्री मीच : रामदास आठवले

Published:

पुणे

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले असून विविध नेत्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षफुटीचे राजकारण झाल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे देशभरातील सर्वांचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीकडे लागले आहे. महायुतीकडून (MahaYuti) परत एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार की यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा येणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदावरुन बिघाडी होणार का याची देखील चर्चा आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आता मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील विधान केले आहे. आठवलेंच्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. खास शैलीमध्ये रामदास आठवले आपल्या शायरींमधून भावना व्यक्त करत असतात. रामदास आठवले हे पुण्यामध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले. मंत्री रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वाद मिटला नाही, तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन असं वक्तव्य रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरे काय काय म्हणाले होते?

अनेक जण म्हणाले, उद्धवजी तुम्ही देशाला दिशा दाखवली. मी म्हणालो आपण जोपर्यंत सरळ होतो. तेव्हा सरळ एकदा वाकड्यात घुसलो तेव्हा आपण वाकड करतो.  भाजप म्हणजे चोर कंपनी आहे. राजकारणतली षंड माणसं आहेत. आपण असा लढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला. मोदीचं भाषण ऐकताना कीव येतीये. मी नगरसेवक कधी झालो नाही थेट मुख्यमंत्री झालो,  जे शक्य होतं ते मी सगळं केलं. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे.  त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी पक्ष कुटुंब सगळं फोडलं. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत, असंही ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img